तरुणाला झाडाला बांधून मुलीवर केला लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून फरार आरोपींचा स्केच प्रसिद्ध

Spread the love

तरुणाला झाडाला बांधून मुलीवर केला लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून फरार आरोपींचा स्केच प्रसिद्ध

योगेश पांडे/वार्ताहर

पुणे – शुक्रवारी पहाटे झालेल्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या मैत्रिणीवर अतिप्रसंग घडल्याची घटना झाली आहे. तरुणीवर तीन आरोपींनी क्रूर रित्या शाररिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.आता या प्रकरणातील संशियताचे स्केच कोंढवा पोलीस स्टेशन गुन्ह्यातील संशयित आरोपींचे स्केच यामध्ये साम्य आढळून आले आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलीसांनी आवाहन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर,संपर्क क्रमांक – ८६९१९९९८९ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५ श्री.युवराज हांडे संपर्क क्रमांक : ८२७५२००९४७/ ९३०७५४५०४५ किंवा नियंत्रण कक्ष पुणे शहर ०२०- २६१२२८८० यावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक मित्र आणि त्याची मैत्रीण बोपदेव घाटावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे तीन अज्ञात व्यक्ती आल्या. त्या तिघांनी फिरण्यासाठी आलेल्या त्या मुलाला आणि मुलीली धमकावलं. त्यांनी या मुलाला त्याचे कपडे काढून, त्याला झाडाला बांधून ठेवलं. त्यानंतर तिघांनी मुलीवर अत्याचार केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी पुण्यात कॉलेजमध्ये शिकत होते. बोपदेव घाटात ते चक्कर मारण्यासाठी आले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात लोक बोपदेव घाटात आले, त्यांनी दोघांना धमकावलं. मुलाला त्यांनी मारहाण केली. त्यानंतर मुलाला त्याच्या शर्ट आणि बेल्टने झाडाला बांधून ठेवलं. अज्ञात तिघांनी मुलीवर अत्याचार केले. संपूर्ण प्रकरणानंतर तरुणाने त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon