शहापूरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

शहापूरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

शहापूर – राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये नेहमीच हाणामाऱ्या होत असतात. मात्र आता तर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी झाली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्यांच्या डोक्यात गाडीच्या लोखंडी रोडने मारहाण केल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहापूर तालुक्यातील खर्डी येथील विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील बारावी आणि दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुरवातीला वाद निर्माण झाला होता. मात्र आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर शाळेच्या बाहेर या विद्यार्थ्यांमधील वादाचे रूपांतर भांडणात झाले. या भांडणात दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गाडीच्या लोखंडी शॉकपने बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. डोक्यात मर लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. यामुळे तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला तत्काळ खर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान खर्डी पोलिस ठाण्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शाळेबाहेर गांजा व नशेच्या पावडरची विक्री केली जात असल्याची जोरदार चर्चा होत आहे असून त्याकडे पोलीस प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon