पिंपरी चिंचवडमध्ये एकाची हत्या; ऐन गणपतीत फूटपाथवर मृतदेह आढळल्याने खळबळ

पिंपरी चिंचवडमध्ये एकाची हत्या; ऐन गणपतीत फूटपाथवर मृतदेह आढळल्याने खळबळ

योगेश पांडे/वार्ताहर 

पिंपरी, चिंचवड – पिंपरी चिंचवडमध्ये ऐन गणेशोत्सवात एकाची हत्या झाल्याचं उघडकीस आलंय. काळेवाडीतील फुटपाथवर दगडाने ठेचून हत्या केली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे मृतदेहाच्या शेजारी रक्ताने मखलेला सिमेंटचा गठ्ठू सापडल्याने दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी वाकड पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवााडील फुटपाथवर दोन बेंचच्यामध्ये हा मृतदेह सोमवारी सकाळी आढळलाय. मृतदेहाच्या शेजारीच रक्ताने माखलेला सिमेंटचा गठठू असल्यानं ही हत्याचं असेल असा पोलिसांचा अंदज आहे. पोलिसांनी त्याच दिशेने तपास सुरु केला आहे. मध्यरात्री तीनच्या नंतर ही घटना घडल्याचा वाकड पोलिसांचा अंदाज आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही, ती ओळख पटली की हत्या करणारा कोण हे उघड होणार आहे. वाकड पोलीस त्याच दिशेने सध्या तपास करतायेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon