बनावट बंदुकीचा धाक दाखवून दोन बालकांच्या अपहरणासह लुटीचा प्रयत्न; गुजरातमधून आरोपीला अटक

Spread the love

बनावट बंदुकीचा धाक दाखवून दोन बालकांच्या अपहरणासह लुटीचा प्रयत्न; गुजरातमधून आरोपीला अटक

योगेश पांडे/वार्ताहर

नाशिक – सटाणा तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात बनावट बंदुकीचा धाक दाखवून दोन लहान बालकांचे अपहरण आणि लुटीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. ऋषिपंचमी असल्याने आई देवदर्शनाला ‘कपालेश्वरला गेली असताना, तर वडील कामानिमित्त सटाणा येथे गेले असतांना घरात कुणी नसल्याचा फायदा घेत संशयितांनी हा प्रयत्न केला आहे. तसेच घरातील पैसे दागिनेही लुटण्याचा यात प्रयत्न झालाय. दरम्यान, हे प्रकरण उजेडात येताच या दोन्ही बालकांचा शोध घेतला असता, अपहरण केल्यानंतर अज्ञात आरोपीने त्यांना शेतात बांधून ठेवल्याचेही उघडकीस आले. या घटनेनंतर सुनील चिंटू पवार या संशयितास स्थानिकांच्या मदतीने पाठलाग करून पकडले. मात्र, या प्रकरानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ऋषिपंचमी निमित्ताने दोन्ही बालकांची आई देवदर्शनासाठी कपालेश्वरला गेली होती. तर वडील कामानिमित्त सटाणा येथे गेले होते. त्यामुळे घरात कुणीही नसतांना किकवारी परिसरातील घरात अभ्यास करणाऱ्या दोघांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र हा प्रयत्न फसला आणि यात गुजरात राज्यातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. वागदर येथे भास्कर अहिरे यांच्या मालकीच्या शेत शिवारातील घरामध्ये रविवारी दुपारी त्यांचा मुलगा आणि मित्र हे दोघे घरामध्ये अभ्यास करत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी घरात घुसून एका मुलाच्या कपाळावर खोटी बंदूक ठेवून घरात पैसे कुठे आहेत, दागिने कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी मुलांनी सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांनी खरे हत्यार काढल्यावर मूल घाबरली. संशयितांनी घराची झाडाझडती घेतली, मात्र त्याला काहीच मिळाले नाही. दरम्यान, प्रसंगावधान राखून मुलांनी वडिलांना फोन करत घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी नातेवाईकांनी घरी येवून पाहिल्यावर त्या दोघा मुलांना शेतात बांधून ठेवल्याचे उघडकीस आले. यावेळी सुनील चिंटू पवार या संशयितास स्थानिकांनी पाठलाग करत पकडले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून पोलिसांनी संशयिता विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon