सावदा पोलीस ठाण्यात जमात रजा-ए-मुस्तफा शाखा लोहारा तर्फे निवेदन
जळगाव / हमीद तडवी
सावदा – मोहम्मद मुस्तफा पैगंबर यांच्या बद्दल अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या भोंदू महाराज रामगिरी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले. भोंदू नारायण गिरी महाराज हे बोलले कि “भारतात १ कोटी पेक्षा जास्त मुस्लिमांनी इस्लाम सोडला. ज्या मौलाना म्हणून इस्लाम धर्माचा अभ्यास केला असता. त्यांना यात अन्याय अत्याचारशिवाय काहीच आढळून आले नाही. ज्यांचे आदर्श अत्याचारी आहेत. अशा शब्दात त्यांनी पैगंबर मोहम्मद मुस्तफा याच्यावर टीका केली. समस्त हिंदू मुस्लिम धर्मात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केली आहेत. तरी या भोंदू बाबा वर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदन देण्यासाठी ऍड. समीर तडवी, मो. असिफ तडवी, इस्माईल तडवी सलीम तडवी व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.