धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा अत्याचार, पोलीसांनी चार जणांना केलं जेरबंद; तर एक फरार

Spread the love

धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा अत्याचार, पोलीसांनी चार जणांना केलं जेरबंद; तर एक फरार

योगेश पांडे / वार्ताहर 

धाराशिव – बदलापूर, पुणे, अकोल्यात झालेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता धाराशिवमध्येही सर्वांना हादरवून टाकणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील भूम इथल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्याची घटना समोर आली आहे. या मुलीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राज्यात महिलांवरील आत्याचार काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता धाराशिवमध्येही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. या मुलीवर पाच तरूणांनी अत्याचार केले. याबाबत या मुलीने पोलीसात तक्रारही दाखल केली आहे. मुलीची प्रकृती बिघडली असल्याने तिला तातडीने धाराशिवच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात तिने आपल्यावर झालेली आपबिती सांगितली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक जण फरार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गौर हसन यांनी दिली आहे.

या आधी बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली होती. त्यानंतर बदलापूरमध्ये जनप्रक्षोभ झाला होता. रेल रोको करण्यात आला. ज्या शाळेत ही घटना झाली तिथे जमावाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले होते. महाविकास आघाडीने तर महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. पण बंदला न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर राज्यभरात निषेध मोर्चे आणि मुक मोर्चे काढण्यात आले. बदलापूरची घटना होत असतानाच पुणे, अकोला इथेही अशाच घटना समोर आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon