शाळकरी मुलीला मित्राकडून दारु पाजून तिच्यावर बलात्कार; अल्पवयीनसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – शाळकरी मुलीला दारु पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या मित्रांसह एका मैत्रीणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि एका मुलाची ओळख होती. त्याने मुलीला आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीने मुलीला फूस लावून एका मित्राच्या घरी नेले. तेथे तिला दारु पाजली. दारुच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. मित्राबरोबर असलेल्या एकाने मोबाइलवर छायाचित्रे काढल्याचे पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड तपास करत आहेत.