पाच रूपयाच्या वादात तरुणावर एसिड हल्ला; आरोपी पित्याला अटक तर अल्पवयीन पुत्राची बालसुधारगृहात रवानगी

Spread the love

पाच रूपयाच्या वादात तरुणावर एसिड हल्ला; आरोपी पित्याला अटक तर अल्पवयीन पुत्राची बालसुधारगृहात रवानगी

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – बदलापूर रेल्वे स्थानकात पाच रुपयांवरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की रागातून असिड हल्ला करण्यात आला या हल्ल्यात तरूणाला गंभीर दुखापद झाली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात शौचालयामध्ये सौच करण्यासाठी गेला असता शौचालय चालक आणि तरूणामध्ये वाद झाला. एका २८ वर्षीय तरूणाने ५ रुपये सुट्टे नसल्याचे बोलताच शौचालय चालक आणि त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. त्या तरूणाच्या त्याच्या चेहऱ्यावर बाथरूम क्लिनर अर्थात असिड फेकलं. यामुळे तरूणाच्या डोळयाला गंभीर दुखापत झाली. आरोपी योगेशकुमार हा बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील शौचालय चालवणारा ठेकेदार आहे. तर पीडित २८ वर्षीय विनायक बाविस्कर हे बदलापूर पश्चिम भागातील गोकुळधाम कॉप्लेक्समध्ये कुटूंबासह राहतात. ते रिक्षाचालक आहे. सोमवारी १९ ऑगस्टला सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे बदलापूर रेल्वे स्थनाकात प्रवाशी येण्याची वाट पाहत होते. इतक्यात ते बदलापूर स्थानकातील शौचालयाचमध्ये गेले.

सौच करून बाहेर आल्यानंतर आरोपी बाप लेकाने विनायककडे शौचचा वापर केल्याबद्दल पाच रुपयाची मागणी केली. मात्र विनायक यांच्याकडे सुट्टे ५ रुपये नसल्याने त्याने ते देण्यास नकार दिला. त्यामुळे पुढे हा सगळा वाद झाला. आरोपी बाप लेकांनी मिळून बेदम मारहाण केली. १५ वर्षीय अल्पवीयन मुलाने विनायकच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी असलेलं एसिड फेकलं. या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. त्याचावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरही ही घटना घडली. फलाट क्रमांक तीनवरच्या शौचालयात हा सगळा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौचालय चालक योगेशकुमार चंद्रपालसिंग याला अटक देखील करण्यात आली आहे. योगेशकुमार चंद्रपालसिंग याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाला ताब्यात घेतलं आहे. विनायक यांच्या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ चे कलम १२४ (१) ३५२, ११५(२), ३(५) या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या आधारे शौचालय चालक योगेशकुमार याला अटक केली तर त्याच्या १५ वर्षीय मुलाची रवानगी भिवंडी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon