बलात्कारी फरार आरोपीला ४ वर्षानंतर बेड्या, गुन्हे शाखा ३ च्या पथकाकडून कारवाई
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने ४ वर्षांने हरिद्वार येथून अटक केली. नाव बदलून तो पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपी अनिल बिडलान हा याचे नालासोपारा येथील एका महिलेशी प्रेमसंबध होते. या महिलेला पहिल्या पतीपासून १८ वर्षांची मुलगी आहे. बिडलान या महिलेच्या घरी ये-जा करत होता. २०२१ मध्ये पीडित मुलीची आई कामाला गेली होती. त्यावेळी आरोपी बिडलान तिच्या घरी गेला. त्याने तिला कामाच्या बहाण्याने एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे मुलीला प्रंचड मानसिक धक्का बसला होता. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात बिडलान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तेव्हापासून तो फरार होता
गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्वीन पाटील आदींच्या पथकाने या आरोपीला पकडण्यात यश मिळवले.