राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईत दोन नवे उपायुक्त, सातारा-सोलापूरला नवे अधीक्षक

Spread the love

राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईत दोन नवे उपायुक्त, सातारा-सोलापूरला नवे अधीक्षक

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्याचसोबत ११ अप्पर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली मुंबई पोलीस उपायुक्तपदी झाली आहे. तर अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अतुल कुलकर्णी – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्रीकृष्ण कोकाटे – पोलीस अधीक्षक, हिंगोली, सुधाकर बी. पठारे – पोलीस अधीक्षक, सातारा, अनुराग जैन – पोलीस अधीक्षक, वर्धा,विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा, शिरीष सरदेशपांडे – पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे,संजय वाय. जाधव – पोलीस अधीक्षक, धाराशीव, कुमार चिता – पोलीस अधीक्षक, यवतमाळ,आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.१, पुणे, नंदकुमार ठाकूर – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड,निलेश तांबे – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर, पवन बनसोड – पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती,नुरुल हसन – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.११, नवी मुंबई,समीर अस्लम शेख – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर,

अमोल तांबे – पोलीस अधीक्षक/दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे,मनिष कलवानिया – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर, अपर्णा गिते – कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon