अरेरे ! दिरानेच केला भावजयचा विनयभंग, कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

अरेरे ! दिरानेच केला भावजयचा विनयभंग, कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

कोपरगाव – कोपरगाव परिसरात दिरानेच भावजयचा विनयभंग केल्याची घटना समोर येत आहे. सदर घटना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून यातील आरोपी व त्याचा मोठा भाऊ असे दोघांचे कुटुंब आहे. अर्थातच ते कुटुंब परप्रांतीय असून ते व्यवसायानिमित्त कोपरगाव शहरात स्थिरावले आहे. त्यातील एका मोठ्या भावाचे लग्न झाले असून एकाचे मात्र तो व्यवसाय करत नाही व व्यसनात गर्क असल्याने त्याचे लग्न जमण्यात नाना अडचणी येत आहे. अशातच तो उपवर झाल्याने घरातील लोकांना त्याची चिंता असताना शोध घेऊनही वधु न मिळाल्याने त्याने घरात कोणी नाही ही संधी साधत सोमवार रात्री अकरा वाजेच्या सुमारास आपल्या मोठया भावजयी ही संरक्षण भिंतीच्या आत उभी असताना तो फिर्यादीच्या अंगावर आला व फिर्यादीस समोरून मिठी मारून तिचा विनयभंग केला आहे व वाईट साईट शिविगाळ करत सदर घटना कोणाला सांगितल्यास फिर्यादीस मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान सदर घटना फिर्यादी महिलेने आपला पती घरी आल्यावर त्यास सांगितली होती त्यानंतर त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी दिर याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह व सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पो.हे.कॉ. डी. आर. तिकोने आदींनी भेट दिली. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं. ३४५/२०२४ भारतीय दंड संहिता सन-२०२३ चे कलम ७४, ३५२, ३५१ (३) प्रमाणे आरोपी दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.को. तीकोने हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon