दादर रेल्वे स्थानकात बॅगमध्ये सापडला मृतदेह; आरोपी तुतारी एक्सप्रेसमधून कोकणात पलायन करणार एवढ्यात पोलिसांची झडप

Spread the love

दादर रेल्वे स्थानकात बॅगमध्ये सापडला मृतदेह; आरोपी तुतारी एक्सप्रेसमधून कोकणात पलायन करणार एवढ्यात पोलिसांची झडप

पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा प्लॅन फसला; दोघांना अटक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – मुंबईतील दादर येथून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. दादर रेल्वेस्थानकात रविवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. एका ट्रॅव्हल ट्रॉली बॅगेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. आरोपी हे तुतारी एक्सप्रेसने मृतदेह कोकणात घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावणार होते. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा प्लॅन फसला. पोलिसांनी याप्रकरणी जय चावडा आणि शिवजीत सिंग या दोन मुकबधीर आरोपींना अटक केली. या दोघांनी मिळून त्यांचा मित्र अर्शद अली सादीक अली शेख याची हत्या केली असल्याची कबूली दिली असून खून का केला याचे कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, अर्शद अली सादीक शेख, जय चावडा. व शिवजीत सिंह हे तिघेही मूकबधिर असून ते एकमेकांचे मित्र होते. रविवारी संध्याकाळी दारु पीत असताना शिवजीत सिंह, अर्शद अली व सादीक शेख यांचा बायको या प्रकरणावरून मोठा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात शिवजीतने अर्शद अली सादीक शेखच्या डोक्यात हातोडा घालून त्याचा खून केला. आरोपी हे सांताक्रुझ परिसरात राहतात असून हत्या झालेला अर्शद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो देखील मूकबधिर आहे असून त्याची पत्नी देखील मूकबधिर आहे. तर आरोपी जय प्रवीण चावडा व शिवजीत सुरेंद्र सिंग हे पायधुनी येथील गुलाल वाडी परिसरात राहतात. या तिघांची क्रिकेट खेळताना मैत्री झाली होती. जय हा अंधेरीतील एका लॅबमध्ये अँनिमेशनचे काम करतो तर शिवजीत हा बेरोजगार आहे. हे तिघेही जयच्या घरी दारू पिण्यासाठी दररविवारी एकत्र येत होते. रविवारी देखील त्यांनी दारूची पार्टी केली होती. मात्र, बायकोवरून तेव्हा अर्शद आणि शिवजीतमध्ये वाद सुरू झाला. याच वादात शिवजितने अर्शदला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचे कपडे काढून त्याला बांधले व दारूच्या बाटल्याने त्याच्यावर वार केले. यावेळी जय दोघांचा व्हिडिओ काढत होता. दरम्यान, अर्शद हा सोडून देण्यासाठी गयावया करत होता. मात्र, शिवजीतने घरातील हातोड्याने अर्शदच्या डोक्यावर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जय आणि शिवजीत हे दोघेही दारू प्यायले होते. शिवजीत दारूच्या नशेत असल्याने त्याने जयला धमकावले तसेच अर्शद च्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितले. रविवारी ८.३० च्या सुमारास अर्शदची हत्या केल्यावर घरातील एका मोठ्या सुटकेसमध्ये दोघांनी अर्शदचा मृतदेह कोंबला. यानंतर दोघांनी मृतदेह हा खाली आणत टॅक्सी पकडून त्यांनी दादर स्टेशन गाठले. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना त्यांच्या हालचालींचा संशय आला. त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यात अर्शदचा मृतदेह असल्याचे आढळून आल्याने पोलीस देखील चक्रावून गेले. आरोपीना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon