मुंब्रामध्ये पाचव्या मजल्यावरून कुत्रा थेट मुलीच्या अंगावर पडून मुलीचा जागीच मृत्यू, तर कुत्रा जखमी
पोलीस महानगर नेटवर्क
मुंब्रा – ठाण्यातील मुंब्रा परिसरात घडलेल्या विचित्र अपघातात चिमुकली जागीच गतप्राण झाली तर ५ व्या मजल्यावरून पडून देखील कुत्रा फक्त जखमी असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुंब्रा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अमृत नगर येथे एक तीन वर्षांची मुलगी रस्त्यावरून जात असतांना शेजारी असलेल्या चिराग मेसन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक कुत्रा थेट या मुलीच्या अंगावर येऊन पडला. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला तर कुत्रा पाचव्या मजल्यावरून पडून देखील वाचला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, एक तीन वर्षांची मुलगी ही तिच्या आई सोबत अमृतनगर येथून जात होती. यावेळी बाजूला असलेल्या चिराग मेसन इमारतीच्या ५ व्या मजल्यावरुन एक कुत्रा थेट खाली पडला. हा कुत्रा रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीच्या अंगावर पडला. या घटनेत मुगली व कुत्रा दोन्ही जखमी झाले. मुलीला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीला तपासले असता, त्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेतील कुत्रा मुलीच्या अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाला. तो काहीवेळ रस्त्यावर पडून राहिला व थोड्याच वेळात उठून लंगडत चालू लागला. त्यांना देखील प्राणी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.