रावेरमध्ये मोबाईल चोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

Spread the love

रावेरमध्ये मोबाईल चोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

हमीद तडवी / जळगाव ब्युरो चीफ

जळगाव – जिल्हयात तालुक्यात गहाळ झालेले पन्नास मोबाइल तीन लाख पन्नास हजारांचा ऐवज नागरिकांना मिळवून दिले. रावेर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील रहिवाशांचे मोबाइल हरवल्या चे प्रमाण वाढले होते. मागील तीन वर्षापासून ते आजपर्यंत बरेच मोबाइल हरवले असल्याबाबत मोबाइल धारक यांनी तक्रारी दिल्या होत्या. या मोबाइल हरवल्या बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव श्री डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव श्री अशोक नखाते, सहायक पोलीस अधीक्षक फैजपूर श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांनी त्यानुसार हरवलेल्या मोबाइल चा शोध घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.रावेर पोलीस स्टेशन चे गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रावेर पोलीस स्टेशन ला मिसिंग च्या दाखल असलेल्या तक्रारींचा तपास हाती घेतला. त्यावरून मोबाइल धारकांनी पुरवलेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची तांत्रिक विश्लेषण बाबत मदत घेऊन पन्नास मोबाइल किंमत तीन लाख पन्नास हजार किमतीचे मोबाइल हस्तगत करुन ते मुळ मालक मोबाइल धारकांना दि. २५/०७/२०२४ रोजी जळगाव जिल्हा चे पालकमंत्री गुलाबराव पाटील. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण,आमदार किशोर पाटील, जळगाव जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद,जळगाव जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नु,प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हा अधिकारी श्रीमती वेवोतुलो केजो, जळगाव जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक फैजपुर अन्नपूर्णा सिंह,रावेर पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, रावेर यांच्या हस्ते नमूद मोबाइल धारक नागरिकांना मोबाइल परत करण्यात आले. तक्रारदार मोबाइल धारक यांना रावेर पोलीस स्टेशनला बोलावून मोबाइल परत करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक फैजपुर अन्नपूर्णा सिंह, रावेर पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, यांनी शेतकरी वर्गाला सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन करून ओनलाइन होणाऱ्या विविध सायबर क्राईम बद्दल माहिती दिली त्यापासून कशा प्रकारे सावध रहावे व यदा कदाचित सायबर क्राईम सुरक्षेच्या महत्वाबाबत तसेच सायबर सुरक्षेबाबत घ्यावयाच्या उपायसुचनां बाबत माहिती देण्यात आली. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहायक पोलीस अधीक्षक फैजपुर, अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक रावेर डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कोंन्स्टेबल सचिन घुगे,आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, गौरव पाटील, मिलिंद पाटील यांनी ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर ह्या मोबाइल हरवल्याच्या तक्रारींमध्ये रावेर तालुक्यातील कुसूंबा येथील मीडिया पोलीस टाईम च्या मुख्य संपादक,पोलीस तपास चे मुख्य क्राईम रिपोर्टर दैनिक रोख ठोक.दैनिक पोलीस महानगर चे ब्युरो चिफ हमीद तडवी यांचा पण मोबाइल परत मिळाल्याने हमीद तडवी यांचेकडून देखील रावेर पोलीस प्रशासन सह जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाचे खूप कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon