ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! अंतर्गत गटबाजीला कंटाळून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Spread the love

ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! अंतर्गत गटबाजीला कंटाळून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राजिनामे दिले. अंतर्गत गटबाजीला कंटाळून सामूहिक राजीनामे देत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या राजिनाम्यांमुळे ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर माजी खासदार राजन विचारे हे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. राजन विचारे यांच्यासह युवासेनेचे काही पदाधिकाऱ्यांनीही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, शहर अधिकारी किरण जाधव, बाळकुम येथील शाखाप्रमुख अभिषेक शिंदे, उपसमन्वयक दिपक कनोजिया आणि खोपटचे विभाग अधिकारी राज वर्मा यांनी राजिनामा दिला आहे. त्यासंदर्भाचे पत्र त्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिवले आहे. गेली १५ वर्षे सातत्याने युवासेना स्थापनेपासून युवकांचे संघटन ठाणे शहरात मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने आम्ही दिवस-रात्र काम करत होते. प्रसंगी विरोधकांना अंगावरही घेतले. परंतु दोन वर्षांत काही निवडक पदाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आमच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत असे पत्रात म्हटले आहे. या राजीनाम्यांमुळे ठाण्यात ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे.

ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, संकटाच्या काळात खांद्याला खादा लावून लढत आहेत. त्यांचा विचार करू. सोडून जाणाऱ्यांचा विचार बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी केला नाही. ठाण्यात शिवसेना नव्याने उभी राहत आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेब यांचे विचार पुढे घेऊन जाणारी नवी पिढी समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon