केळवा पोलिस ठाण्यात राबविले आरोग्य तपासणी शिबिर
पालघर / नवीन पाटील
दैनंदिन जीवनात कायदा आणि सुव्यवस्था राबविण्यात मशगुल असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष पाहता, केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार २४ जुलै रोजी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरात पोलीस अधिकारी, अंमलदार आणि कर्मचारी यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. यात डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयासंदर्भातील आजार इत्यादी आजारांवरिल तपासणी आणि आरोग्याबाबत योग्य ती काळजी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरकारी आरोग्य अधिकारी स्वाती थोरात आणि त्यांची टीम उपस्थित होती. या शिबिराचा लाभ केळवा सागरी पोलीस ठाण्याचे एक अधिकारी आणि एकूण २२ अंमलदार यांनी घेतला.