वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ७ गुन्हे उघड
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गरीब नवाज कैटरर्सच्या मालक अस्लम बकई खान यांच्या दूकानतील गल्ल्यातील ६० हजार रुपयाची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरले.फिर्यादि कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नौपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल करून या प्रकारणात तपास सुरु केला. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसउपनिरीक्षक मंगेश भांगे व पोउनि कुंभार यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे तपासी अधिकारी यांनी तपास चालू केला असता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील तसेच आरोपिच्या येण्या – जाण्याऱ्या मार्गावरील समारे २५ सीसीटीवी फुटेजची तपसणी करून प्राप्त फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीत आरोपी अजय रणजीत हजारे हा नवी मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यावरुन पोलीसांनी कोपरी गांव,वाशी परिसरात सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपसात आरोपीने त्याचा साथिदार रोहित पाटणकर याचेसह नौपाडा पोलिस ठाण्या हद्दीत इतर ५ वेगवेगळे चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. सदर आरोपीकडून एक ऑटोरिक्शा पितळी गणेश मूर्ति,पितळी भांडी व रोख रक्कम असा एकूण १. ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.