अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेत सरकारचा मोठा निर्णय; रत्नागिरी, नवी मुंबई शहरासह ठाण्यातील सर्व शाळांना आज सुट्टी

Spread the love

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेत सरकारचा मोठा निर्णय; रत्नागिरी, नवी मुंबई शहरासह ठाण्यातील सर्व शाळांना आज सुट्टी

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरी, नवी मुंबई शहरासह ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई शहराबाबतचा निर्णय आयुक्त कैलाश शिंदे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व माध्यमांच्या शाळा आज बंद राहणार आहेत. हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ. १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना दि. ०९/०७/२०२४रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार दि. ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणी महाविद्यालय उद्या बंद राहणार आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहेत.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान करण्यात आले आहेत. आपती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित

जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात उद्या दिनांक ९ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री व बावनदी, लांजा येथील मुचकुंदी व काजळी नदी, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या दिनांक ९ जुलै रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon