अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरातील चोरीचा गुन्हा उघड; सराईत चोरट्याकडून १८ तोळ्याचे दागिने हस्तगत
पोलीस महानगर नेटवर्क
सातारा – मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरी झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास सातारा पोलिसांना यश आले. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला असून या चोरट्याकडून तीन गुन्हे उघड केले आहे. १८ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले असून त्याची किंमत १३ लाख ३१ हजारांचे एवढी आहे.अभिनेत्रीच्या घरी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना तपास करण्याचे आदेश दिले होते.
अभिनेत्रीच्या घरातील खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले सुमारे ३ लाख ८२ हजारांचे दागिने लांबविले होते. याप्रकरणी पोलीस अभिलेखावरील राजकुमार उर्फ राजु ओंकारप्पा आपचे ( कोथळी ता. उमरगा, धाराशिव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सातारा, भुईंज, लोणंद हे तीन घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितल्याने त्याच्याकडून १३ लाख ३१ हजारांचे दागिने व दुचाकी जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे व उपनिरीक्षक अमित पाटील यांनी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.
दि.२८/०६/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा पोलीस अभिलेखावरील आरोपी नामे राजकुमार उर्फ राजु ओंकारप्पा आपचे रा. कोथळी ता.उमरगा जि. धाराशिव पाने केला असुन तो सातारा शहर व तालुका परिसरात वावरत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना बातमीचा आशय सांगुन नमुद इसमास ताब्यात घेवुन पुढील कारवाई करणेच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या तपास पथकाने सदर संशयीत इसमास पेट्रोलींग दरम्यान वाढेफाटा परिससरात सापळा लावुन १८.०० वा. च्या सुमारास ताब्यात घेतले. सदर आरोपी राजकुमार उर्फ राजु ओंकारप्या आपचे वय ३० वर्षे रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव याच्याकडे तपास पथकाने कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याने सातारा शहर, भुईज व लोणंद पोलीस स्टेशन येथील घरफोडी ३ गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन घरफोडी चोरीचे एकुण ०३ गुन्हे उघड करुन एकूण १८.३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बाजार भावाप्रमाणे १२,४४,४००/-रु. व ७०००/- रु. किं.ची चांदीचे दागिणे व ८०,०००/- रु.कि.ची गुन्हा करणेसाठी वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल असा एकूण १३.३१.४००/- मुद्देमाल हस्तगत केला.