ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात २१ नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात ८९ बालके दगावली
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय या रुग्णालयात अनेक रुग्ण उपचाराकरता येत असतात. जून महिन्यात तब्बल २१ नवजात बालकांनी त्यांचा जीव गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये एकाच दिवशी १८ रुग्ण दगावल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच पुन्हा एकदा ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. २०२४ मध्ये जानेवारी महिन्यात १७ फेब्रुवारी मध्ये १० मार्चमध्ये २२ एप्रिल मध्ये २४ तर मे महिन्यात १६ आणि मागील जून महिन्यात २१ अशा नवाजात बालकांनी त्यांचा जीव गमावला आहे.एकूण ८९ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. मागील महिन्यात पाहिले तर रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात ५१२ महिलांची प्रसुती करण्यात आली आहे.जन्माला आलेले ९० नवजात बालके हे गंभीररित्या आले होते त्यातील २१ जणांचा मृत्यू तर या मध्ये ही बाहेरून आलेली होती तर काही अगदी गंभीर १९ नवजात बालकांचे वजन हव्या त्या वजनापेक्षा कमी होते. १५ बालक नऊ महिन्याच्या आधी जन्मलेले होते ६ नवजात बालके हे रुग्णालयाच्या बाहेर जन्मलेले होते परिस्थितीमध्ये होती. तर यातील तीन नवजात बालक रुग्णालयात भरती होण्याआधी मृत्यू झाले होते.१३ नवजात बालकांच वजन दीड किलो पेक्षा कमी होते .यातील तीन नवजात बालकाचे वजन एक किलो पेक्षा कमी होते .काहींनी त्यांचा जीव ४८ तासाच्या आतच गमावल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
ठाणे जिल्हा रुग्णालयाचे नुतनीकरणाचे काम सुरू असून हे रुग्णालय मनोरुग्णालयाच्या बाजूला हलवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना हे रुग्णालय प्रवासाच्या दृष्टीने लांब पडते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे सद्यस्थितीत महत्त्वाचे रुग्णालय मानले जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता, असुविधा आणि डॉक्टरांचे दुर्लक्ष या सगळ्या बाबींमुळे हे रुग्णालय चर्चेचा विषय ठरल आहे. ऑगस्ट २०२३ रोजी एकाच दिवसात १८ रुग्ण दगावल्याची घटना येथे घडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयात सुविधा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही रुग्णालयात सुविधा नसल्याची ओरड रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. तर रुग्णालयावर मोठा भार पडत असून भिवंडी, मुरबाड , शहापूर कल्याण आदी भागात एन आय सीयु ची सोय नसल्याने नवजात बालक अत्यावस्थ अवस्थेत येथे येतात. मात्र तत्काळ उपचार मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपचार करणे कठीण असते. त्यामुळेच रुग्ण दगावण्याच्या घटना घडतात अशी सर्वात सर्व येथील अधिकारी डॉक्टर राकेश बारोट यांच्याकडून करण्यात येत आहे.छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय केवळ ३० एन आय सी यू खाट असून त्यातील २० खाटा रुग्णालयातील रुग्णांसाठी तर १० बाहेरून आलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.