विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांचा टेम्पो पलटी, पाच वारकरी जखमी तर २० जणांना दुखापत

Spread the love

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांचा टेम्पो पलटी, पाच वारकरी जखमी तर २० जणांना दुखापत

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला पुण्यात किरकोळ अपघात झाला आहे. वारकऱ्यांचा टेम्पो उलटून पाच वारकरी जखमी तर २० जणांना दुखापत झाली आहे. पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जखमी वारकऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. जखमींमध्ये बहुतांश महिला वारकरी दिसून येत आहेत. हातात भगव्या पताका, डोक्यावरी तुळस, टाळ – मृदंगाचा गजर आणि माऊली – तुकोबांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दखल झाली आहे. लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीच्या दिशेने निघाला आहे. दोन्ही पालखीचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान वारकऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री घडली आहे. हा टेम्पो परभणी वरून पंढरपूरकडे निघाला होता. यातले वीस वारकरी हे मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना घडली आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावर चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. पाचही वारकऱ्यांना उपचार देऊन सोडण्यात आलं आहे.

 

प्रयागबाई नारायण बोखारे ( ७२) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चोपडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कात्रज – कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक एक येथे टेम्पोचालक चोपडे याचे नियंत्रण सुटले. टेम्पो उलटून टेम्पोतील वारकऱ्यांना दुखापत झाली.

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता. हातात भगव्या पताका आणि मुखात विठू माऊलीचा जप करत त्यांची दिंडी पुण्यात पोहोचली होती. टेम्पो पलटल्यानंतर पंधरा वीस वारकरी गाडी खाली आले. त्यामुळे वारकरी सैरावैरा धावले, नंतर नेमकं काय घडलं हे त्यांच्या लक्षात आलं. मग जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी इतर वारकरी धावले. वडगाव मावळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतलं आणि जखमी वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. लगतच्या खाजगी रुग्णालयांमध्ये जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon