पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी बातमी; विशाल अग्रवालला जामीन मंजूर, पण सुटका नाही
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायालयाने काही अटीशर्तींवर विशाल अग्रवालला जामीन मंजूर केला आहे. विशाल अग्रवालला आज जामीन मंजूर झाला असला तरी त्याला तपास यंत्रणांना तपाुासाठी सहकार्य करावं लागणार आहे. याच अटीच्या आधारावर विशाल अग्रवालला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशाल अग्रवाल याच्यावर दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. मात्र इतर दोन गुन्ह्यांत तो न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. त्यामुळे विशाल अग्रवाल याचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे. विशाल अगरवला याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून दोघांचा जीव घेतला होता. मुलगा अल्पवयीन आहे आणि दारूच्या नशेत होता. विशाल अग्रवालवरती येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात विशाल अग्रवाल याला जामीन देण्यात आलाय.