राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई, तब्बल एक कोटीहून अधिक किमतीच्या ४९४ किलो गांजासह दोघांना अटक

Spread the love

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई, तब्बल एक कोटीहून अधिक किमतीच्या ४९४ किलो गांजासह दोघांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

रायगड – मुंबईसह उपनगरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून अंमली पदार्थांची तस्करी किंवा अंमली पदार्थांची अवैध विक्रीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यातच, रायगड पोलिसांनी मोठी कारवाई केली असून ४९४ किलो गांजा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथून तब्बल १ कोटी रुपये किमंतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पनवेल येथील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने कार्यालयास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार १२ जून रोजी सांयकाळी पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजूस असलेल्या स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर छापा टाकला. या धाडीत गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ७ वाजता तळोजा याठिकाणी छापा टाकला असता एक महिन्द्रा कंपनीची एक्सयुवी ५०० गाडीमध्ये आरिफ जाकीर शेख (२५) आणि परवेझ बाबुअली शेख (२) यांच्या ताबे कब्जात पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये अंदाजे ४९४ किलो, एक कोटी रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा गांजाचा साठा मिळून आला. सदर आरोपी इसमांच्या ताब्यातून एकूण १,१३,९०,००० रुपये किमंतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करुन दोन्ही आरोपीयांना गुन्हयाच्या पुढील तपासकामी अटक केली आहे. आरोपींविरूध्द एन.डी.पी.एस. एक्ट कलम ८ (क), २० (ब) (II), २९ तसेच भा.द.स. कलम ३२८ अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयामध्ये अंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे संचालक, उप-आयुक्त प्रदिप पवार, आर.आर.कोले यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आकाड, दुय्यम निरीक्षक डी.सी.लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी.निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, तसेच सहायक दु.नि. जी.सी. पालवे, महिला जवान आर.डी.कांबळे, निशा ठाकुर, जवान ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम, हे सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon