नार्कोटेस्ट विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून लाखोंची फसवणूक; खोपोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Spread the love

नार्कोटेस्ट विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून लाखोंची फसवणूक; खोपोली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलीस महानगर नेटवर्क

रायगड – नार्कोटिक्स विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगून कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातील खोपोली तालुक्यात घडला आहे. या घटनेतील टोळीतील सहा आरोपींना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये गुजरातच्या अनेक भागातून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

खोपोलीस तालुक्यातील मुळगाव येथील एका बड्या कंपनीतील उपाध्यक्षांना मोबाईल वर एक फोन आला. तुमच्या कडे फेडेक्स कुरीअर मधून अमंली पदार्थ आणि काही संशयित वस्तू आल्या आहेत. त्याची अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई मार्फत चौकशी सुरू आहे. ज्यात अंतराराष्ट्रीय व्यापारी सहभागी आहेत. साडे आठ लाख डॉलर्सचे हे रॅकेट असून, तुम्ही त्यात आरोपी आहात. यातून वाचायचे असेल तर १९ लाख ८१ हजार द्यावे लागतील असे सांगत सर्व रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर वळती करून घेण्यात आली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच संबधित कंपनीच्या उपाध्यक्षाने याबाबत खोपोलीस पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात भादवी कलम ३८८, ४२०, ४१९, ३८४, ४६५, ४६८, ४७१, ४८४, १२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या घटनेप्रकरणी, रायगड पोलिसांकडून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा शोध लावण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ६ आरोपी असल्याचं निदर्शनात आल्यानंतर या आरोपींना सुरत, गांधीनगर, अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ९ लाख ९७ हजार आणि १६ मोबाइल सेल फोन जप्त करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon