छ. संभाजीनगरात गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश, विद्यार्थिनीच केंद्र चालवत असल्याचा संशय
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. शहरातील एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये गर्भलिंग निदान केंद्र सुरू होत. या केंद्राचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोग्य विभागानं छत्रपती संभाजीनगमधील हे गर्भलिंग निदान केंद्र उद्ध्वस्त केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारी एक मुलगी हे गर्भलिंग निदान केंद्र चालवत होती, असा संशय आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेन मोठी कारवाई केली आहे. शहरातील गारखेडा परिसरात एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये गर्भलिंग निदान केंद्र सुरू होतं. या गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश करण्यात आला आहे. धक्कादायक माहिती म्हणजे अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारी एक तरुणी हे गर्भलिंग निदान केंद्र चालवत होती. असा संशय आहे.
महापालिकेच्या पथकानं घटनास्थळी छापा घालून १२ लाख ७८ हजारांची रोकड आणि सोबतच गर्भलिंग निदान करण्याचे साहित्य जप्त केलं आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे .