वाशीमध्ये पाण्याच्या टाकीचं बांधकाम करताना कामगाराचा मृत्यू; पोलीसांनी दोघांविरोधात केला गुन्हा दाखल

Spread the love

वाशीमध्ये पाण्याच्या टाकीचं बांधकाम करताना कामगाराचा मृत्यू; पोलीसांनी दोघांविरोधात केला गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – वाशी येथे नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान तिसऱ्या मजल्यावरून खालीपडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.सदर बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सेफ्टी जाळी नव्हती, त्यामुळे खाली कोसळून कामगाराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी सेफ्टी ऑफिसर आणि सब कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणातून मनपा अधिकारी आणि मुख्य कंत्राटदाराला जाणीवपूर्वक वाचविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कामगाराच्या मृत्यूनंतर अन्य कामगारांनी हळहळ व्यक्त केलीये. मृत कामगाराच्या कुटुंबियांकडून देखील आक्रोश आणि संताप व्यक्त केला जात आहे. रोजच्याप्रमाणे कामावर जाताना आज आपल्यासोबत असं काही घडेल याची पुसटशीही कल्पना या कामगाराला नव्हती. या घटनेनंतर तरी मनपा अधिकारी आणि मुख्य कंत्राटदार कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष देणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणारे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon