तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर माझी जबाबदारी वाढणार आहे – अजित पवार

Spread the love

तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर माझी जबाबदारी वाढणार आहे – अजित पवार

बरामती मतदारसंघात अजित पवारांचा मतदारांना आवाहन

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सूनेत्रा पवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. या लढाईमुळे या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे. यासाठी अजित पवार यांनी देखील मतदारांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. अशात एका भाषणादरम्यान तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर माझी जबाबदारी वाढणार आहे. उद्या बायकोने काम करून दे म्हटलं तर सकाळी उठून करून द्यावेच लागेल, नाहीतर काही खरं नाही, असं भाष्य अजित पवारांनी केले. अजित पवार हे मंगळवारी रात्री खडकवासला विधानसभा मतदारसंघात बारामती लोकसभा निवडणुकीत प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते. त्यावेळी अजित पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, या गावाची ८० टक्के जागा एनडीएसाठी घेतली आहे. आता बंधन आणि तोडगा काढायचा आहे. हे केव्हा निघेल, जेव्हा संरक्षण मंत्र्यांचा विचाराचा खासदार ज्या वेळेस जाईल, तेव्हा मिळेल.

आम्ही म्हणतोय घड्याळ मतदान करा म्हणजे आपोआप होईल. तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदाराच तिथं चाललंच नाही. आता त्यांना सोडलं. आम्हाला सोडून गेले. आम्ही आमचा पक्ष ठेवला, असे ते म्हणाले. माझा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे पालिका, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राज्य सरकार निधी आहे. माझी पणं जबाबदारी वाढणार आहे. उद्या बायको घरी म्हणाली की, हे काम करुन द्या, तर सकाळी मला करुन द्यावेच लागणार आहे, नाहीतर माझं काही खरं नाही, असे अजित पवार पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon