६ वर्षांच्या पुतण्याच्या मृत्यू; विरहाने काकाने स्वतःला ट्रेनखाली झोकून संपवलं जीवन.

Spread the love

६ वर्षांच्या पुतण्याच्या मृत्यू; विरहाने काकाने स्वतःला ट्रेनखाली झोकून संपवलं जीवन.

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलाचा मृत्यू त्याच्या काकाला सहन झाला नाही. त्यानंतर या काकाने ट्रेनखाली झोकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या बाहेरील खड्ड्यात पडल्याने ६ वर्षीय आयुष शेगोकारचा मृत्यू झाला. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मुलाचा मृत्यू झाला. आयुषच्या मृत्यूनंतर शेगोकार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आयुष हा त्याच्या काकाकडे राहत होता

पुतण्या आयुषच्या मृत्यूमुळे काका शैलेश शेगोकारला नैराश्यात गेला. आयुषच्या मृत्यूनंतर त्याचा काका शैलेश शेगोकरने लोकल ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली. शैलेशने रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली. आयुषच्या काकाने चेंबूर आणि गोवंडीच्या मध्यावर ट्रेनखाली आत्महत्या केली आहे. आयुष हा मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या बाहेर खेळत होता. त्यावेळी आयुष हा पाण्याने भरलेल्या ९ फूट खड्ड्यात पडला. या घटनेनंतर रेल्वे स्टेशनजवळील एका प्रवाशाच्या लक्षात आलं की, त्यानंतर प्रवाशाने आयुषला खड्ड्यातून बाहेर काढलं. त्यानंतर काही जणांना प्रवासांना सावध केलं. या घटनेची माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पुढे वाशी जीआरपीच्या जवानांनी आयुषला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान, आयुषचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon