डोंबिवलीमध्ये ऑनलाइन फसवणूक, ७ लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक ; टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – वेगवेगळे टास्क देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. सायबर विभागाकडून सातत्याने ऑनलाइन फसवणुकीबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. तरीही काही लोक कळत नकळत ऑनलाइन फसवणुकीचे शिकार होत आहे. अशीच एक घटना डोंबिवली मधील गोग्रासवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेला (३५ वर्ष), यांच्यासोबत घडलेली आहे. सदर महिलेला १३ मार्च ते २७ मार्च दरम्यान अनोळखी मोबाईलधारक महिला व इसमाने व्हॉटअँप्सवर मेसेज करून शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक फायदा करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यांच्या या भूलथापांना बळी पडून पीडित महिलेने एकूण ७,४६,३२५/- रुपये ऑनलाइन पाठवले असता त्यानंतर कोणताच फायदा झाला नाही व गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत मिळाली नसल्याने सदर महिलेची आर्थिक फसवणुक केली आहे.
या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुध्द गुन्हा रजि. नं. || ३४१/२०२४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम हे करीत आहेत.