माकुणसार गावातील बेकायदेशीर जुगार अड्डा उधळला…
केळवा पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करून ११ जुगाऱ्यांना पकडले…
सफाळे / प्रतिनिधी
केळवा सागरी पोलिस स्टेशन हद्दीतील माकुणसार गावाजवळील ब्राम्हदेव मंदिरासमोरील मोकळ्या जागेत खुलेआम तीन पत्ती जुगाराचा खेळ खेळणाऱ्या ११ जणांना केळवा सागरी पोलिसांनी शुक्रवार ५ एप्रिल रोजी पकडले. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५ लाख ९६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
लोकसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आल्याने पालघर पोलिस एक्शन मोडवर आली आहे. याच अनुषंघाने केळवा सागरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांनी हद्दीतील कार्यक्षेत्रात दिवस रात्र पेट्रोलिंग सुरु केले आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास टेंभीखोडावे येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान शुक्रवार ५ एप्रिल रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंगवर असताना केळवा पोलिसांनी माकूणसार गावाच्या हद्दीतील ब्राह्मणदेव मंदिरासमोरील रूपेश पाटील यांच्या घराच्या पाठीमागील चिंचेच्या झाडाखाली बेकायदेशीर तीन पत्ती जुगार खेळ सुरू असल्याचे निदर्शनात आले. पोलिसांनी तात्काळ धाड टाकून ११ जणांना अटक केले. सोबतच त्यांच्या जवळील रोख रक्कम जुगाराचे साहित्य, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण ५ लाख ९७ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी केळवा सागरी पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ चे कलम (१२ अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.