अंबरनाथमध्ये पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

अंबरनाथमध्ये पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

अंबरनाथ – अंबरनाथमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंबरनाथ जवळील जांभूळ गावात विजेचा धक्का लागून तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबरनाथमध्ये जांभूळ गावात पाण्याच्या टाकीचे काम सुरू होते. यावेळी टाकीतून पाणी उपसण्याचे काम सुरू असताना पाणी उपसा करणाऱ्या मोटारमधून विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे कामगारांना विजेचा धक्का बसला ज्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गुलशन मंडल, राजन मंडल आणि शालिग्राम कुमार मंडल अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon