नेरुळमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला केली अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील नेरुळमध्ये एका १६ वर्षीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या नेरुळमध्ये राहणाऱ्या एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने फूस लावून जबरदस्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते.
या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधम तरुणाला अटक केली आहे. नेरुळ पोलिसांनी आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस अधिक तपास करत आहेत.