धक्कादायक ! नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून पुस्तकांऐवजी आढळली धारदार शस्त्र

Spread the love

धक्कादायक ! नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून पुस्तकांऐवजी आढळली धारदार शस्त्र

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – नाशिकमध्ये शाळकरी मुलांच्या दप्तरात आता पुस्तकांऐवजी धारदार शस्त्रे आढळून येत आहेत. ही घटना ज्ञानदानासाठी लाजिरवाणी आहे तसेच पालकांची डोकेदुखी वाढवणारी धक्कादायक घटना आहे. पाच अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून नाशिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने ७ चॉपर, १ कोयता आणि १ गुप्ती अशी घातक शस्त्र ताब्यात घेतली आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एका मुलाला मारहाण करायला येणार होता आणि तो येताच त्याच्यावर हल्ला चढवण्याच्या अशा तयारीत ही सर्व मुले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी चिंचबन परिसरात सापळा रचून मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील शस्त्रे त्यांनी गुजरातच्या बडोद्याहून मागवली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या वादामागे प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा पोलिसांना संशय आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागच्या काही दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. याचदरम्यान मुलांच्या बॅगेत धारदार शस्त्रं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या मुलांच्या बॅगेची झडती घेतली. त्यांच्या बॅगेत धारधार शस्त्र आणि कोयते आढळून आले आहेत. पोलिसांनी या मुलांची चौकशी केली असता, मुलीच्या वादातून आपल्याच मित्राचा गेम करण्यासाठी बॅगेत शस्त्र ठेवल्याची माहिती संशयीत मुलांनी पोलिसांनी दिली आहे. या घटनेनं पोलिसांना देखील धक्का बसला आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon