कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एस्क्लेटरजवळ पैशांनी भरलेली बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

Spread the love

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एस्क्लेटरजवळ पैशांनी भरलेली बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

चांदीचे दागिने, ३० हजारांची रोकड असलेली बॅग पोलिसांनी सुपूर्त केली मालकाला

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – शुक्रवारी सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एस्क्लेटरजवळ एक बेवारस बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. स्टेशन परिसरात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सतर्कता दाखवत मोठ्या धाडसने बॅग तपासली असता या बॅगेत नवीन कपडे व चांदीचे दागिने, ३० हजार रोकड असलेली पर्स आढळून आली. त्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलिसांनी तत्काळ बॅगेच्या मालकाशी संपर्क साधला व त्यांना बॅग, चांदीचे दागिने, ३० हजारांची रोकड सुपूर्त करण्यात आली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे प्रवाशाला आपली बॅग परत मिळाली. त्यामुळे त्याने वाहतूक पोलिसांचे आभार मानले.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडे स्टेशन परिसरात एस्कलेटर शेजारी एक बॅग बेवारस रित्या पडली होती. काही नागरिकांचे लक्ष गेलं त्यांनी याबाबत जवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस ट्राफिक ऑर्डर नाही याबाबत माहिती दिली. वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डनने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.बॅगेची झडती घेतली असता बॅगेमध्ये नवीन कपडे,चांदीचे दागिने व ३० हजार रोकड असल्याचं आढळले. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांनी देखील सुटकेचा विश्वास सोडला. वाहतूक पोलिसांनी या बॅगमालकाचा शोध सुरू केला. बॅगेत असलेल्या कागदपत्रांच्या सहाय्याने वाहतूक पोलिसांनी बॅगमालकाला संपर्क केला असता लक्ष्मीदास गुप्ता असे या प्रवाशाचे नाव होते. शुक्रवारी सकाळी पत्नी व मुलांसह तो उत्तर प्रदेश येथून कल्याणला आला होता. रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर घरी जाण्याची घाई असल्याने बॅग स्टेशन वर विसरला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुप्ता यांना आपली बॅग परत मिळाली त्यामुळे त्यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश शिरसाठ यांनीदेखील ट्राफिक वॉर्डन व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon