प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला डहाणू पोलिसांनी पश्चिम बंगालमधून केली अटक

Spread the love

प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला डहाणू पोलिसांनी पश्चिम बंगालमधून केली अटक

योगेश पांडे /वार्ताहर 

पालघर – किरकोळ वादावरून आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या करून पसार झालेल्या प्रियकराला पश्चिम बंगाल मधून अटक करण्यात डहाणू पोलिसांना यश आले आहे. रवींद्र रेड्डी असे आराेपीचे नाव असून त्याला न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास डहाणूच्या पोलिस उपअधीक्षक अंकिता कणसे करत आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील लोणीपाडा येथे गेल्या आठवड्यात एका महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर तिच्यासोबत पश्चिम बंगाल मधून पळून आलेल्या तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले.

हे प्रेमी युगुल विवाहित असून आपल्या पती-पत्नीला सोडून ते डहाणू येथे खोट्या नावाने मागील काही महिन्यांपासून राहत होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाल्याने प्रियकर रवींद्र याने प्रेयसी अनिशा रेड्डी हिची हत्या केली. या हत्येनंतर पश्चिम बंगाल येथे पळून गेलेल्या प्रियकराला डहाणू पोलिसांनी मोठ्या शिताफीने सात दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अटक केली. पाेलिसांनी आराेपी रवींद्र रेड्डी याच्यावर डहाणू पोलिस ठाण्यात (कलम ३०२) गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केलं असता १ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . या प्रकरणाचा अधिक तपास सद्या डहाणूच्या पोलीस उप अधीक्षक अंकिता कणसे करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon