बेकायदेशीर लोखंडी कोयता बाळगणारा तडीपार गुंड अटकेत

Spread the love

बेकायदेशीर लोखंडी कोयता बाळगणारा तडीपार गुंड अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली – तडीपार कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडाला डोंबिवली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून बेकायदेशीररित्या लोखंडी कोयता बाळगला असताना अटक करण्यात आली.

गणेश उर्फ गटल्या बाळू आहिरे (वय २२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शेलार नाका, डोंबिवली पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गणेश उर्फ गटल्या बाळू आहिरे याच्या विरोधात गंभीर गु्न्हे दाखल आहेत. त्याला ठाणे जिल्ह्यातून पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३,कल्याण यांनी १८ महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतर पोलीस उपायुक्त,परिमंडळ -३ यांच्या परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना मनाई आदेशाचा भंग करून गणेश आहिरे हा दि.२५ मार्च,२०२४ रोजी दिनेश मेडिकल समोर, शेलार नाका, डोंबिवली पूर्व येथे एक लोखंडी कोयता बेकायदेशीररित्या जवळ बाळगला असताना गुन्हे शाखा घटक -३, कल्याणच्या पथकास माहिती मिळाली असता आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. बेकायदेशीररित्या लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं. || ३८३/२०२४, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास डोंबिवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हासगुळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon