मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून बिबवेवाडीत तरुणाचा खून

Spread the love

मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून बिबवेवाडीत तरुणाचा खून

पोलीस महानगर नेटवर्क

बिबवेवाडी – पुण्यात खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बिबवेवाडी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक केली असून पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरानगर परिसरात नियोजित व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी अनेक दुकानांसाठी गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र तेथील एका गाळ्यामध्ये तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी त्या तरूणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे समोर आले. बसवराज चिदानंद गजंत्रे असे मृत तरूणाचे नाव आहे.

बसवराज याने नातेवाईकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरले होते. तो वाईटसाईट बोलला होता, यामुळेच वाद झाला आणि संशयित आरोपीने त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगड घालून मारहाण केली. या मारहाणीत बसवराज हा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून तपासणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon