बैलगाडा शर्यतीचे ‘गोल्डमॅन’ पंढरीनाथ फडके यांचं निधन
पनवेल – गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं निधन झालंआहे. पंढरीशेठ यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे आज पनवेल येथे निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. जवळपास ४०-५० शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहे.
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती. पंढरीशेठ यांची तरुणांमध्ये मोठी क्रेज होती. पंढरीशेठ जिथे असतील तिथे गर्दी आपोआप जमायची. पंढरीशेठ यांच्या हटके डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पंढरीशेठ यांच्यावर बरीच गाणी देखील बनली होती. लोकप्रिय असलेल्या पंढरीशेठ यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.