कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी ; पोलिसांकडून गुन्हा दाखल
कल्याण – कल्याण डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाली असून अनेक घरे व दुकाने यांना चोरट्यानी लक्ष केले आहे.पोलिसांनी अनेकवेळा कारवाई करून देखील चोरट्याना कोणतीच भीती वाटत नसल्याचे दिसून येत आहे. काटेमानिवली परिसरातील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने त्यावाटे आत प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३,९०,०००/- रु.किंमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला आहे.
याबाबत फिर्यादी विश्वनाथ कान्हू कोकाटे (४६) रा. काटेमानिवली,कल्याण पूर्व यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा रजि. नं. ३०९/२०२४ भा.द.वि. कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे हे़ करीत आहेत.