धक्कादायक ! अंबरनाथ शहर दुहेरी हत्याकांडानं हादरलं, दोघा मित्रांची अज्ञाताने केली हत्या
प्रकाश संकपाळ
अंबरनाथ – अंबरनाथ पूर्वेच्या दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे. सुरज परमार आणि सुरज कोरी या दोन तरुणांची लाठ्या काठ्या मारून हत्या करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी दुहेरी हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. सूरज परमार आणि सूरज कोरी या दोन तरुणांची हत्या झाली. या दोन तरुणांची लाठ्या काठ्या मारून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या हत्येने दुर्गापाडा परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील २० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, मृत झालेल्या दोन्ही व्यक्ती भुरटे चोर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या दोन तरुणांची हत्या का झाली? कशी झाली? का करण्यात आली? याबाबत विविध अंदाज पोलिसांकडून लावले जात आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच उल्हासनगर क्राईम ब्रँच संयुक्तिकरीत्या करीत आहे.