गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणात २० कोटी खंडणीची मागणी ; अन्यथा जीवे मारण्याची धमकी

Spread the love

गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणात २० कोटी खंडणीची मागणी ; अन्यथा जीवे मारण्याची धमकी

नाशिक – प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या मालकीच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी आलेल्या इस्माकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धमकावल्याप्रकरणी स्वीय सहायक मुनीराज मीना यांनी तक्रार दिली आहे. वाडकर यांची नाशिकरोड येथे सर्व्हे क्रमांक सात / १३ अ ही मिळकत आहे. मीना हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना या जागेचे प्रकरण आमच्याकडे आल्याचे सांगून तडजोड होईपर्यंत या ठिकाणी प्रवेश करू नये, असे धमकावले. दरगोडे बंधूना १५ कोटी आणि आमच्या टोळीसाठी पाच कोटी रुपये द्यावेत, अन्यथा जिवे मारण्यात येईल, अशी धमकी दिल्याचे मीना यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खंडणी आणि धमकी प्रकरणी दोन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले.

गायक वाडकर यांच्या भूखंड खरेदीचा विषय हा एक ते दीड दशकांपासून गाजत आहे. मागील महिन्यात शहरात आयोजित पुरस्कार सोहळ्यात वाडकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी नाशिकमध्ये संगीत महाविद्यालयासाठी जागा खरेदी व्यवहारात कशी फसवणूक झाली, ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच आपली कैफियत मांडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon