कल्याण डोंबिवलीत रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना हातचलाखी करून लुटणाऱ्या इसमास अटक ; कल्याण गुन्हेची कारवाई
प्रकाश संकपाळ
कल्याण – कल्याण डोंबिवली परिसरात पायी चालणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू लूटणाऱ्या इसमास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे.अफजल बन्ना खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत
पायी चालणाऱ्या लोकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने सोन्याचे दागिने लुटणारा इसम हा त्याच्याकडील चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सोनार गल्ली,कल्याण पश्चिम परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती,त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अफजल बन्ना खान यास ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून २,६३,९३८ /- रु.किंमतीचे ७ तोळे, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले,पोलीस उप आयुक्त,गुन्हे शिवराज पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१,ठाणे शहर गुन्हे शाखा,निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पवार,पोलीस निरीक्षक राहुल मस्के,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले व त्यांच्या पथकाने केली.