डीझने + हॉट स्टार अँप सबस्क्रिप्शन अपग्रेड करण्याच्या नावाखाली वृद्ध महिलेची साडे दहा लाखांची फसवणूक

Spread the love

डीझने + हॉट स्टार अँप सबस्क्रिप्शन अपग्रेड करण्याच्या नावाखाली वृद्ध महिलेची साडे दहा लाखांची फसवणूक

नाशिक – एका अँपचे सबस्क्रिप्शन अपग्रेड करण्याच्या नावाखाली एका अज्ञात सायबर भामट्याने वृद्धेची साडेदहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून,पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ही मोबाईलमध्ये ऑनलाईन अँप सर्च करीत होती, त्या दरम्यान ७८६४०४९६१३ या क्रमांकावरून अज्ञात मोबाईलधारकाने या महिलेशी संपर्क साधला. त्यांना डीझने + हॉट स्टार या अँपचे सबस्क्रिप्शन अपग्रेड करण्याच्या नावाखाली संपर्क साधला.

त्यादरम्यान गुगलद्वारे प्राप्त झालेल्या मोबाईलवर संपर्क करून अज्ञात इसमाने वृद्ध महिलेच्या एनीडेस्क रिमोट अँपद्वारे महिलेच्या मोबाईलचा ऍक्सेस घेऊन त्यातून कस्टमर आयडी शोधून काढला.त्यानंतर या महिलेला विश्वासात घेऊन तिच्याकडून तिच्या बँक खात्याविषयी माहिती मिळवली. अज्ञात भामट्याने नेट बँकिंगद्वारे आयएमपीसी व एनईएफटीद्वारे दि. ४ व ५ जानेवारीदरम्यान महिलेच्या बँक खात्यातून एकूण १० लाख ५० हजार डेबिट करून घेऊन महिलेची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon