नाशिकमध्ये दारू पिताना मित्रांमध्ये वाद झाल्याने मित्रानेच केला मित्राचा खून
नाशिक – डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना कामटवाडे परिसरात घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघे मित्र आहेत. सायंकाळी दोघे दारु पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते.तेव्हा इंगळे ने आनंद आंबेकर ला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने आंबेकर ने आनंद इंगळे च्या डोक्यात फरशी मारली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपासाची सर्व सूत्रे फिरवत संशयित आनंद आंबेकर ला ताब्यात घेतले.अंबड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.