देशी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास पोलिसांकडून अटक ; ‘एलसीबी’ची कारवाई

Spread the love

देशी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास पोलिसांकडून अटक ; ‘एलसीबी’ची कारवाई

वाशिम – एका २९ वर्षीय तरुणाजवळ विनापरवाना देशी बनावटीची पिस्टल आणि मॅगझिन सापडल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाशिम तालुक्यातील ग्राम मोहगव्हाण, येथील नितीन बबन दंदे (२९) हा तरुण देशी बनावटीची पिस्टल विनापरवाना बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. त्यानुषंगाने पंचासह नमूद ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता कमरेला एक सिल्व्हर रंगाची तथा देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह आढळून आली. त्याचा कुठलाही परवाना त्याच्याकडे नसल्याचे सिद्ध झाले.

याप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये नमूद आरोपीवर कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या पथकाने कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon