कल्याण स्थानक परिसरात स्मार्टसिटीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल ; नागरिकांनी सहकार्य करावे – गिरीश बने

Spread the love

कल्याण स्थानक परिसरात स्मार्टसिटीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल ; नागरिकांनी सहकार्य करावे – गिरीश बने

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत स्मार्टसिटी योजनेमार्फत वल्लीपिर चौक ते महात्मा फुले चौक दरम्यान उड्डाणपूलाचे काम सुरू आहे तसेच राज्य परिहवन आगाराचा पुनर्विकास करून सदर ठिकाणी बहुमजली इमारत उभारून उड्डाणपूलास जोडण्यात येणार आहे. या करिता एस.टी. स्टॅण्ड ते रेल्वे आरक्षण पर्यंत रस्ता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रहदारीसाठी बंद करून वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून एक दिशा मार्ग करण्यात येईल. एसटी स्टॅण्ड इनगेट ते झुंझारराव मार्केट ते गुरुदेव हॉटेल दरम्यान एक दिशा मार्ग करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे गुरुदेव हॉटेल कडून कल्याण स्टेशन व झुंझारराव मार्केटकडे येणाऱ्या वाहनांना गुरुदेव हॉटेल येथे प्रवेश बंदी करण्यात येईल. सदरची वाहने गुरुदेव हॉटेल पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुष्पराज हॉटेल या मार्गाने इच्छित स्थळी जातील किंवा ज्यांना झुंझारराव मार्केट येथे जायचे असेल त्यांनी डी मार्ट, आर्चीज गॅलरी या मार्गाने जावे.

आर्चीज गॅलरी ते साधना हॉटेल ते नाना नानी पार्क (मागील बाजू) ते टेनिस कोर्ट (केडीएमसी) हा मार्ग एक दिशा करण्यात येणार आहे, टेनिस कोर्ट कडून साधना हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यात येणार आहे, सदरची वाहने कराची मेडिकल आर्चीज गॅलरी गल्ली मार्गे इच्छित स्थळी जातील. सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सुभाष चौक येथून कल्याण स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे तसेच कल्याण स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व खाजगी वाहनांना महात्मा फुले चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. सदर वाहने यू टर्न घेऊन सुभाष चौक मार्गे इच्छित जातील त्याचप्रमाणे जड व अवजड वाहने सुभाष चौक येथून प्रेम ऑटोमार्गे इच्छित जातील अशी अधिसूचना वाहतूक विभागातर्फे काढण्यात आली आहे. याची अंमलबजावणी येत्या ४ दिवसात करण्यात येईल.

स्मार्टसीटी योजनेअंतर्गत कल्याण शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कल्याण स्थानक परीसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत, सर्व नागरिकांनी वाहतूक पोलिसांना व वाहतूक विभागाला सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon