केंद्रीय व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील, ठाकरेंचं राम मंदिर उभारणीत योगदान काय? – गिरीश महाजन

Spread the love

केंद्रीय व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील, ठाकरेंचं राम मंदिर उभारणीत योगदान काय? – गिरीश महाजन

योगेश पांडे – वार्ताहर 

मुंबई – अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. राम मंदिराच्या लोकार्पणासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नसल्याचा दावा केला जात आहे. यावरून मानपमान नाट्य घडत असून, यावरून ठाकरे गटाने केंद्रावर जोरदार टिका केली आहे. या टिकेला भाजप कडून प्रत्युत्तर देण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रितांवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी देशातील व्हीव्हीआयपी व्यक्तिनांच निमंत्रित करण्यात आला आहे. जवळपास आठ ते साढ़ेआठ हजार लोकानां निमंत्रित करण्यात आले आहे. केन्द्राच्या व्हीव्हीआयपी यादित उद्धव ठाकरे नाव नसेल. राम मंदिरावरून ते टिका करतात. उद्धव ठाकरेंना बोलवण्याचे कारण काय? अशी विचारणा गिरीश महाजन यांनी केली.

केन्द्राच्या व्हीव्हीआयपी यादित उद्धव ठाकरे नसतील. उद्धव ठाकरेंचं अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वानां माहिती आहे. ते साधे एमएलसी तेही पहिल्या टर्मचे आहेत. त्यामुळे कदाचित केन्द्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीमध्ये ते नसतील किंवा आणखी काही कारण असेल. घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे. आम्ही २० दिवस जेल मध्ये होतो, संजय राऊत – उद्धव ठाकरे त्यावेळी कुठे होते? संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा, असे आवाहन गिरीश महाजन यांनी दिले. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र उद्धव ठाकरे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. त्यांचे काही योगदान नाही, अशी टिका गिरीश महाजन यांनी केली. दुसरीकडे, राज ठाकरे यांना राम मंदिर लोकार्पणाचे निमंत्रण असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटिल आणि छगन भुजबळ यांच्यात ज्या पद्धतिने टिका चालू आहे, ती खालच्या भाषेत चालू आहे. मला वाटते ते कुठे तरी थांबले पाहिजे. दोन नेत्यांमधील वाद थांबला पाहिजे. समाज, समाजात दुफळी निर्माण होता कामा नये. छगन भुजबळ यांनाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी विनंती केली की आता हे थांबवा. मी ज्या दिवशी जरांगे पाटिल यांच्याकडे गेलो त्यांनाही सांगितले की आता हे थांबवा. पुन्हा शब्दाला शब्द होउ नये, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon