लोकांना बोलण्यात गुंतवूण व त्यांचे सोन्याचे दागीणे आणि रोख रक्कम घेवून फसवणूक करणाऱ्या आरोपीतांना गुन्हे शाखा घटक – ३ कल्याण
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण : गुन्हे शाखा, घटक ०३, कल्याण कडील नेमणुकीतील पोलीस किशोर पाटील व रविंद्र लांडगे यांना गुप्त बातमीदार कडून माहीती मिळाली की, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हयातील फसवणुक करणारे दोन संशयीत आरोपी कल्याण रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एसटी बस स्टॅण्ड येथे येवून तेथून एसटी बसने बाहेर गांवी जाणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे व.पो. निरी. नरेश पवार यांच्या आदेशान्वये घटक कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कल्याण एस.टी. स्टॅण्ड, कल्याण प. येथे सापळा रचुन संशयीत दोन इसम नरेश विजयकुमार जैसवाल वय ४० वर्षे रा. डी १, रूम नं. १०१, शांती सुमती बिल्डींग, म्हाडा कॉलणी, भारतनगर, चेंबुर, मुंबई नं. ७४ २ अनिल कृष्णा शेट्टी वय ४५ वर्षे रा. होमबाबा टेकडीवर, हणुमान नगर, नेतीवली नाका, कल्याण पुर्व यांना १९:१५ वाजता ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांचे कडे सोन्याचे दागीणे तसेच महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, विष्णूनगर व डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकुण ०६ फसवणुकीच्या गुन्हयातील गेला माल सोन्याचे दागीणे असा एकुण ३,७३,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा, घटक ०३, कल्याण यांना यश आले आहे. कल्याण गुन्हे शाखा घटक ०३ यांनी दोन्ही आरोपींना महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले आहे.
प्रस्तुत यशस्वी कामगिरी . पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व निलेश सोनावणे सहा. पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. नरेश पवार, सपोनि/संदिप चव्हाण, सपोनि/संतोष उगलमुगले, पोउनि/संजय माळी, पो.हवा. किशोर पाटील, विलास कडू, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, अनुप कामत, पो.ना. सचिन वानखेडे, पो.कॉ. रविंद्र लांडगे, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, चा.पो.हवा. अमोल बोरकर यांनी केलेली आहे.