हिंसक आंदोलन कर्त्यांकडून नुकसान भरपाईची वसुली होणार

Spread the love

हिंसक आंदोलन कर्त्यांकडून नुकसान भरपाईची वसुली होणार

बीड – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात व शहरात झालेल्या आंदोलनाने ३० ऑक्टोबर रोजी हिंसक वळण घेतले. यात जमावाकडून आमदार प्रकाश सोळंके व संदीप क्षीरसागर यांचे घरे पेटवून देण्यात आली होते. तसेच माजलगाव नगरपरिषद इमारतीला देखील आग लावण्यात आली होती. ही घटना राज्यात वाऱ्यासारखी पसरली होती. शांतेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलनाचे हिंसक वळण आंदोलनकर्त्यांना चांगलेच महागात पडणार आहे. यामध्ये सुमारे ११ कोटी रुपयांचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे पुढे आले आहे.  ही नुकसान भरपाई या हिंसक आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून संतप्त झालेल्या जमावाने बीड मध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करुन दगडफेक व जाळपोळ केली होती. यात अनेक सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसांनी १४४ आंदोलकांवर गुंध्ये दाखल त्यांना तक केली आहे. तसेच २ हजार आंदोलंकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी सांगितले. याबाबतीत आतापर्यंत सुमारे ५०० लोकांची चौकशी करण्यात आली आहे. तथापि, या आंदोलकांच्या अडून पूर्वनियोजित जाळपोळ करण्यात आल्याचा आरोप काही राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आला आहे. बीड मध्ये शासकीय कार्यालये, राजकिय पक्षाची कार्यलय व एसटी बसेसला आग लावणे व काचा फोडण्यात आल्या होत्या. यात जाळपोळ करणारे हे बीड भागासह अन्य तालुक्यातील असल्याची माहिती आता समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon