डोंबिवलीत वडिलांनी केली दहा वर्ष गतीमंद मुलीची हत्या

Spread the love

डोंबिवलीत वडिलांनी केली दहा वर्ष गतीमंद मुलीची हत्या

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली जवळ असलेल्या मानपाडा गावात रविवारी संध्याकाळी एका दारोड्याने राहत्या घरातच स्वतःच्या १० वर्षाच्या गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केली. या प्रकारानंतर मारेकरी दारोडा पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी गेला. तेथे घरात मुलगी मयत झाल्याची माहिती देऊन तेथून तो फरार झाला. या प्रकाराने गावात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

मुलीची आई लिलावती अग्रहरी हिच्या तक्रारीवरुन पती मनोज अग्रहरी (३५) या दारोड्या विरुध्द मानपाडा पोलिसांनी खुनाचा गु्न्हा दाखल केला आहे. अग्रहरी कुटुंब गोरगरीब आहे. तक्रारदार लिलावती यांना तीन मुली आहेत. त्यातून एक मुलगी मात्र मतिमंद आहे. दोन मुली मजुरीची कामे करतात. या मुलींचे वडील मनोज हा दारोडा आहेत. डोंबिवलीत एका किरणा दुकानात तो कामगार म्हणून काम करत असतो.

बाहेरून कुणी तरी पाजलेली सर्माड-गावठी दारू ढोसून आल्यावर मनोज नेहमी पत्नी आणि दोन मुलींसह बिचाऱ्या गतिमान गतिमंद मुलीला झोडपत असायचा. या गतीमंद मुलीचा काही उपयोग नाही. तिला मरावेच लागेल, अशी भाषा तो करत असायचा. या बद्दल पत्नीने तक्रार दाखल केली आहे. इतर दोन मुलींसह पत्नीचाही गळा दाबून ते तिला मारण्याचा प्रयत्न करायचा. गतिमंद मुलीच्या संगोपनाकडे आईचे पूर्ण लक्ष असायचे. दुपारच्या वेळेत मुलीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याने ती कामावरुन काही वेळासाठी घरी यायची आणि पुन्हा कामावर जात असे.

रविवारी संध्याकाळी मनोज नेहमीप्रमाणे यथेच्छ दारू ढोसून घरी आला. त्याने दारुच्या नशेत गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केली. मात्र शेजाऱ्यांच्याना या प्रकाराची कुणकुण लागली होती. तर मनोज हा पत्नी काम करत असलेल्या एमआयडीसीतील कामाच्या ठिकाणी गेला. तेथील कर्मचाऱ्यांना पत्नी लिलावती हिला तातडीने घरी जाण्यास सांगा. गतिमंद मुलगी मयत झाली आहे, असा निरोप दिला. तेथून दारोड्या मनोजने पळ काढला. कर्मचाऱ्यांनी मुलीची आई लिलावतीला तिच्या पतीने केलेल्या उपद्व्यापाचा घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून लिलावतीने तातडीने घरी पळ काढला. तेव्हा मुलगी बिछान्यावर निपचित पडली होती. दारोडा पती मनोजने यानेच आपल्या गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त करुन केला. लिलावतीने पती मनोज अग्रहरी विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon